Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियामध्ये निवड

अखेर अजिंक्य रहाणे याच्यासमोर बीसीसीआय झुकलंच. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी अजिंक्य रहाणे याची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा महामुकाबला खेळणार आहे. मुंबई | क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या निमित्ताने टीम इंडियात स्टार खेळाडूचं जवळपास 1 वर्ष 3 महिन्यांनंतर कमबॅक झालं आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणे याच्या कामगिरीची दखल घेत अखेर त्याला संधी दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अंजिंक्य रहाणे याने अखेरचा कसोटी सामना हा 2022 जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो टीममधून बाहेर होता. काही वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या टीम इंडियाच्या 2 खंद्या कार्यकर्त्यांना निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. चेतेश्वर पुजारा याने काही महिन्यांनी संघात स्थान मिळवलं. मात्र अजिंक्य रहाणे बाहेरच होता. त्याला इथवर पुन्हा पोहचण्यासाठी भरपूर संघर्ष आणि प्रतिक्षा करावी लागली. या दरम्यानच्या काळात त्याने आपली छाप सोडली. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 16 व्या मोसमातही त्याने आतापर्यंत धमाका केलाय. त्यामुळे आता रहाणे या एकमेव पण महत्वाच्या महामुकाबल्यात कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. महामुकाबला केव्हा? टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. WTC Final साठी टीम इंडिया रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Comments

Popular posts from this blog

Free Language Translator Tool: Easily Translate Language by Using this Tool and become a millionaire after selling this tool